Now Loading

अफगाणिस्तान: नांगरहार प्रांतातील मशिदीत भीषण बॉम्बस्फोट, 12 जण जखमी

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, पूर्व अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी मोठा स्फोट झाला आहे. नांगरहार प्रांतातील स्पिन घर जिल्ह्यातील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, मशिदीत झालेल्या स्फोटात स्थानिक मौलवीसह किमान 12 जण जखमी झाले आहेत. मशिदीच्या आतील भागात दीडच्या सुमारास हा स्फोट झाला. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने या स्फोटाला दुजोरा दिला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
 

अधिक माहितीसाठी - News 18