Now Loading

*एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाश्यांचा मनस्ताप..* *प्रतिक कु-हेकर* *मुर्तिजापूर* राज्यातील अनेक जिल्ह्यात काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन धुमसत असून, यात रविवारी अकोला जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी उडी घेतली. दुपारनंतर बस सेवा ठप्प झाली. सोमवार पासून तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बसफेऱ्या ही बंद होणार आहेत.ऐन सनम सौदीतील पुकारलेल्या संपामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. लाल परीची अचानक थांबल्याने भाऊबीजला माहेरी निघालेल्या बहिणीची वाट अडली आहे. खाजगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय प्रवाशांना समोर पर्याय नव्हता. परिणामी मुर्तीजापुर बस स्थानकावर शुकशुकाट पहावयास मिळाली. एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे याच अन्य मागण्यांसह कर्मचाऱ्यांची आग्रही आहेत. अनेक वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली. त्यात डिझेलच्या किमती वाढल्याने एसटी बसचा दैनंदिन खर्च भागवणे ही कठीण होत आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढतच असून राज्य शासनाकडून महामंडळाला तुटपुंजी मदत मिळते. यासह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर दिवाळीनंतर मार्ग काढू असे वचन सरकारकडून दिले होते, मात्र वचन पाळले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणास मूर्तिजापुर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्ष दीपक पाटील दांदळे यांनी आपला पाठिंबा दर्शविला. रविवारी सकाळपासूनच विविध मागण्यांसाठी एसटीच्या विविध कामगार संघटनांनी एकत्र येत बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील दांदळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष गौरव मोरे, संतोष गोलाईत,सुनील शिंदे ,रोहन नवघरे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांत स्थळी जाऊन आपला पाठिंबा दर्शविला. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करून सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता बेमुदत राज्यव्यापी संप सुरू झाला असून या संपात मूर्तिजापूर येथील आगारातील सर्व कर्मचारी, वाहक- चालक, कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनीदेखील रविवार पासून बेमुदत संप पुकारला त्यामुळे मुर्तीजापुर बस आगारातून धावणाऱ्या सर्व मार्गावरील बसेस बंद झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी आंदोलनार्थ आपले बलिदान दिले त्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन "तुमचे बलिदान वाया जाणार नाही" अशा घोषणा देण्यात आल्या. राज्यव्यापी संपात मूर्तिजापूर येथील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून आगाराच्या समोर कर्मचाऱ्यांनी रविवारी दिवसभर बसून आंदोलन केले तसेच जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली. ******************* " एसटीचे महाराष्ट्र राज्य शासनात विलगीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी- सवलती, वेतन व भत्ते त्वरित लागू करण्यात यावे तसेच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचा कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल". *दीपक पाटील दांदळे* *तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मूर्तिजापुर* ***************** " एसटीचा संप सुरू झाल्याने प्रवाशांना खाजगी बस वाहतुकीवर अवलंबण्यास शिवाय पर्याय नाही. परतीच्या प्रवासासाठी अनेकांनी आरक्षण केले. मात्र संपामुळे त्यावर पाणी सोडावे लागत आहे. संपाचा फायदा खासगी वाहतूक घेत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे". *प्रवाशी वर्ग* *********************** :- मुर्तीजापुर बस स्थानकावर दुपारनंतर बसची वाहतूक बंद झाली. चौकशी कक्षात कोणीच कर्मचारी नव्हते, प्रवाशांना माहिती सांगण्यासाठी हि कोणी नव्हते. :- एसटीची आर्थिक घडी विस्कटलेली असून कर्मचाऱ्यांचे वेतन अनिश्चित असून कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या हि वाढतच आहेत. :- कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा ही पीडा सुटलेला नाहीत अशा अनेक मागण्यांसाठी परिवहन मंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनांची बैठक झाली. :- परिवहन मंत्र्यांच्या बैठकीतही मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.