Now Loading

न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे T20 विश्वचषक फायनल आणि भारत दौऱ्यातून या कारणामुळे बाहेर

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर त्याच्याच बॅटने जखमी झाला होता. त्याच्या हाताला झालेली दुखापत अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कॉनवे विश्वचषक फायनल तसेच भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की, डेव्हन कॉनवे मालिकेतून बाहेर पडल्याने खूप निराश आहे. मात्र, त्याचा बदली खेळाडू म्हणून आतापर्यंत अन्य कोणत्याही खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. डेव्हन कॉनवेने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 38 चेंडूत 46 धावांची शानदार खेळी केली होती.

 

अधिक माहितीसाठी: NDTV Sports | Hindustan Times