Now Loading

शासकीय वसतिगृहात शिरला पट्टेदार वाघ; वसतिगृहात मुले नसल्याने हानी टळली

सिंदेवाही - सकाळी 8.30 ते वाजताच्या दरम्यान पाथरी रोडवरिल मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या समोरील लोखंडी गेट वरून उडी मारून एक पट्टेदार वाघ वसतिगृहाच्या आतमध्ये प्रवेश केला. दरम्यान वस्तीगृहाला सुट्ट्या असल्याने वसतिगृहात विध्यार्थी हजर नव्हते केवळ चौकीदार आपल्या खोलीत उपस्थित होता त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. सिंदेवाही शाहरापसुन जवळच पाथरी रोड वर वसलेले मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हे अगदी रस्त्याच्या कडेला असून शेत शिवार लागूनच आहे. परंतु या वस्तीगृहाच्या मागील बाजूस घनदाट जंगल असून नेहमीच या परिसरात वाघाचे दर्शन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना सायंकाळच्या सुमारास होत असते. परंतु आज दिनांक 13 नोव्हे च्या सकाळी 8.30 ते 9.00 वाजताच्या दरम्यान अचानक पणे शेतशिवारातून पट्टेदार वाघ येऊन वस्तीगृहाच्या उंच अश्या लोखंडी गेट वरून उडी मारून थेट वसतिगृहाच्या प्रांगनात प्रवेश करणे म्हणजे आश्चर्यकारक बाब आहे. सदर वाघ हा प्रवेश करून आतमध्ये आल्याचे चौकीदाराच्या लक्षात येताच त्याने वसतिगृहाचे अधीक्षक विष्णु घुबे यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करुन याची माहिती दिली. लगेच त्यांनी ही बाब वनविभागाच्या अधिकारी यांना सांगितले असता त्यांची चमू वेळीच उपस्थित होऊन वाघाला हाकलून लावले जर आज वस्तीगृहात विध्यार्थी असते तर खूप मोठी घटना घडली असती. सध्या सुट्ट्या असल्याने विध्यार्थी आपल्या स्वगावी गेले आहेत तिथे केवळ चौकीदारच असतो पुढे देखील अश्या घटना घडू नयेत या करिता संपूर्ण वसतिगृहाच्या वाल कंपाउंड वरून काटेरी तारांचे कुंपन करण्यात यावे तसेच सदर वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वसतिगृह अधीक्षक विष्णु घुबे यांनी तसेच बाजूच्या शेतकऱ्यांनी केली आहे.