Now Loading

वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका स्वबळावर लढविणार..

पाचोरा येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्व.राजीव गांधी टाऊन हॉल येथे भव्य मेळावा घेण्यात आला. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रमोद इंगळे अध्यक्षस्थानी होते तसेच जिल्हा कार्यालय सचिव वैभव शिवतारे. जितेंद्र केदार जळगाव . अनिल केंद्रे इत्यादी प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होते यावेळी वैभव शिवतारे यांनी वंचित बहुजन आघाडीचे केलेल्या कामांची माहिती दिली तसेच कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करीत आहे . जिल्हा अध्यक्ष आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांना महत्वाचे स्थान देऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे कार्यकर्त्यांमुळे पक्ष वाढीला जातो वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचे काम जोरदार आहे तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर पक्ष हा सर्वांच्या पाठीशी आहे असे वक्तृत्व प्रमोद इंगळे यांनी कार्यकर्त्यांना दिले यावेळी पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केला आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीत येणाऱ्या सर्व निवडणका स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून मोर्चा बांधणीला लागावे यावेळी वंचित बहुजन आघाडी ची तालुका कार्यकारणी जाहीर केली.या मेळाव्याचे आयोजन विशाल बागुल यांनी केले होते.यावेळी विशाल बागुल यांनी सांगितले की संपूर्ण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी साखळी तयार करून प्रत्येकाला न्याय देण्यासाठी काम करणार.सुत्रसंचालन शांताराम चौधरी तर आभार विशाल बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश मराठे.प्रमोद सोनवणे.गौतम बागुल आदिंनी परिक्षम घेतले यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदविला