Now Loading

राजधानीतील वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालय बनले कडक, लॉकडाऊन लागू करण्यास सांगितले

देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत या गंभीर मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, दिल्ली-एनसीआरमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मास्क लावून घरी बसावे लागेल. त्याचबरोबर प्रदूषणाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय पावले उचलली आहेत, असा सवालही न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबतही विचार करावा.