Now Loading

"NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळेच लोकांचे जात आहे जीव"

राष्ट्रीय महामार्ग वडकी ते देवधरी दरम्यान मरणाचे खड्डे असून एकाच हप्त्यात दोन अपघात आणि दोन्ही जागीच ठार झाल्याच्या घटना घडल्या आहे. दोष देतो आपण नशिबाला की इतकच आयुष्य होत त्यांचं असं म्हणतात. आणि घडलेलं विसरुन जातात. पण या अपघात मरणाला खरं कारण रोड वरील खड्डे आणि वाहतूक प्रशासन देखील आहे. हायवे पोलीस रोज वाहने अडवतात , त्यांना दंड देखील आकारतात, काय त्यांना रोडवरील खड्डे दिसत नाही का? यांनी जर प्राधिकरण कंत्राटदाराला सुचवले असते तर अनेक जीव वाचले असते. परंतु एकमेकांप्रती आपुलकी दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याने जिवाचे मोल कळत नाही. ज्यांच्या घरातील जीव असतो तो घरातील कर्ता असतो , घराचं छत्र असतो , आज त्या कुटुंबाला पोरखं व्हावे लागते आहे ते केवळ या रोडच्या खड्यामुळे. गोष्ट अशी की टोल टॅक्स वसुलताना तुमची गय केल्या जात नाही. कारण तुम्हाला रोडवरील सुविधा देण्याचं सोंग हे करतात. Fast-tag लावून तुम्हाला लवकर जाऊ देतात. कारण रोडची अवस्था तुम्हाला दिसू नये. *" निमूटपणे टॅक्स भरा आणि खड्ड्या मध्ये पडून मरा "* असेही म्हणायला हरकत नाही. आज राष्ट्रीय महामार्ग ७ म्हणताना त्या रोडची अवस्था अशी असेल तर गाव खेड्यातील रोडची दुर्दश्या पाहवल्या जाणार नाही. तिकडे मा. रस्ते वाहतूक मंत्री सहा पदरी रोडची स्वप्न रंगवत आहे. इथे तर प्रत्येक पदरात खड्डे आहे. समोर आणखी किती जिवं घेतील ही प्रशासन व्यवस्था. सदर बाब मा. रस्ते वाहतूक मंत्री पर्यंत पोहचावी आणि ज्यांची जीव गेली त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रोडवर आपण सर्व चालतो काय माहिती कोणत्या खड्यात आपला नंबर आहे. म्हणून बेजबाबदार होवून चालणार नाही. #बेजबाबदारी जीवं घेत आहे , जबाबदारी स्वीकारणाऱ्या कुटुंब प्रमुखाची. लवकरात लवकर रोड सुरळीत केला नाही तर टॅक्स भरणार नाही तसेच मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ह्यावेळी समाजसेवी संघटनानी दिला आहे.