Now Loading

राज्यमंत्री तनपुरे यांचा सिंदेवाही शहरात जंगी स्वागत

सिंदेवाही- ऊर्जामंत्री व नगर विकास आदिवासी व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आज दिनांक 13 नोव्हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना नागभीड येथे जनता दरबारात सहभागी होण्याकरिता जात असतांना सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा शहर कार्यकर्ता यांच्या वतीने ने जंगी स्वागत करण्यात आला. प्रथमत: राज्यमंत्री तनपुरे यांचे शिवजी चौकात सर्व कार्यकर्ता च्या वतीने स्वागत करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही येथील विश्राम गृहात सर्व राकांपा चे कार्यकर्ता व सर्व विभागातील अधिकारी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे नगरपंचायत निवडणूक विषय राकांपा चे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली सोबतच सिंदेवाही तालुक्यातील व शहरातील विविध समस्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक चे जिल्हाध्यक्ष नितिन भाटारक हे प्रामुख्याने उपस्थित होते. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदेवाही चे तालुकाध्यक्ष मनोजकुमार सैनी, इब्राहिम शेख शहर अध्यक्ष राकांपा सिंदेवाही, कविता खाडे महिला अध्यक्ष राकांपा सिंदेवाही, दामोदर नन्नावार, राहुल गंडाइत अध्यक्ष राकांपा लोनवाही, अनंत बांबोळे राकांपा युवक चे शहर अध्यक्ष सिंदेवाही, मुजीबउल्ला शेख तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल राकांपा सिंदेवाही, राजकुमार अलोने शहर महासचिव, वहाबभाई सैय्यद, गंगा भैसारे, इंद्रजीत कराडे, वसंत कुरमेथे, नरेश टोंगे, लक्ष्मीचंद गहाने, पुष्पा साखरे, रत्ना शेन्डे, स्नेहा नागरे तसेच राकांपा च्या तालुका व शहर चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.