Now Loading

सिंदेवाहीतील ते लॉजींग हॉटेल की कुंटणखाना?; बंद खोलीत घडते अनैतिक प्रकार

सिंदेवाही- हे शहर तालुक्याचे ठिकाण असुन येथे औद्योगिक शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज, नर्सिंग कॉलेज आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील मुले व मुली तालुकास्थरावर येऊन शिक्षण घेत असतात. वडिलांचा तालुक्याच्या ठिकाणी पाठविण्याचा उद्देश हा मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावा हा असतो. ग्रामीण भागातून मुले-मुली ह्या उच्च शिक्षणासाठी सिंदेवाहीत येतात. सिंदेवाहीत उपलब्ध असलेल्या सेमी इंग्लिश मिडीयम, विज्ञान, गृहविज्ञान, औद्योगिक संस्थेत शिक्षण घेण्याकरिता पालकवर्ग त्यांना काबाळकष्ट करून पाठवितात. पालकांचा एकच उद्देश असतो की माझं मुलं खूप शिकावं आणि आपलं आयुष्य उज्वल करावं. मात्र पालकांचा उद्देश फेटाळून घडतंय ते काही वेगळंच. मुले-मुली ह्या सिंदेवाही तालुक्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातून कुणी शाळेच्या कारणाने तर कुणी ट्युशन क्लासेसच्या कारणाने घरुन लवकर येतात, सुट्टीच्या दिवशी येतात किंवा सुट्टी उशिरा झाल्याचा कारण घरी सांगतात आणि आपल्या बॉयफ्रेंड सोबत लॉजवर एक दोन तासांचे १००० ते १५०० रुपये देऊन भाड्याची रूम करून बंद खोलीत अनैतिक प्रकार घडवतात. एवढंच नाहीतर विवाहित पुरुष/महिला सुद्धा आपल्या घरी खोटं बोलून लॉजिंगवर येऊन जुन्या नव्या प्रियकरांच्या भेटी घेतात. अश्या चर्चा थेट सिंदेवाहीतील चायटपरीवर, चौकात नागरिकांमध्ये सुरू आहे. इतकं भयंकर चित्र विचित्र कृत्य सिंदेवाहीमधील लॉजिंगवर घडत आहे. मग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा आहे की नाही? असा थेट प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. *{नागरिकांची प्रतिक्रिया-}* १) मुलगा-मुलगी दोघांची सहमती असते तर कोण काय करणार? २) तरुण विद्यार्थी, विद्यार्थीनींनी वडिलांचा विश्वास तोडून असे कृत्य करणे एकदम चुकीचे आहे. असे कृत्य करत असणार तर पालकांच्या मनात पुढील उच्च शिक्षणासाठी द्वेष निर्माण होऊ शकतो. ३) विवाहित पुरुष यांनी आपल्या पत्नीच्या आणि महिलांनी नवऱ्यांचा मागे असे कृत्य केल्याने अख्खे कुटुंब, संसार उध्वस्त होऊ शकतो. त्याचे विपरीत परिणाम घरच्या मुलींमुलांवर पडतात.