Now Loading

नॅशनल अचिव्हमेंट सर्वे ( NAS) ची टीम जिल्हा परिषद शाळा भांब व इतर सात शाळेमध्ये  दाखल

राळेगाव तालुक्यातील भांब व इतर सात शाळेमध्ये  नॅशनल अचिव्हमेंट सर्व NAS ची टिम दाखल झाली त्यावेळी जिल्हा परिषद शाळा भांब व ग्रामपंचायत भांब च्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व  विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.  नंतर NAS च्या टीमचे ग्रामपंचायत सरपंच सौ.माधुरी ताई झाडे व उपसरपंच विजय कोल्हे आणि शाळेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांना NAS सर्वे बदल मार्गदर्शन केले आणि ग्रामपंचायत व शाळा यांनी टीमच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीचे टीमने खूप मनापासून आभार मानले   आणि नंतर ग्रामपंचायत सरपंच माधुरीताई झाडे ,उपसरपंच विजयराव कोल्हे ग्रामपंचायत सदस्य नितीनजी झाडे,सदस्या कु.धरती कोवे, गामसेवक मडावी ग्रा.प.भांब शाळेचे मुख्याध्यापक जुमनाके सहायक शिक्षिका तेजस्विनी योगेशराव गलाट  व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलासराव डंभारे, नरेशजी कुबडे, यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा च्या शुभेच्छा दिल्या आणि सर्वेला सुरवात करण्यात आली. व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आठमुडी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वडकी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाढोणा बाजार, शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा किनी जवादे, बचपन इं.मे.स्कूल राळेगाव, मार्कंड पब्लिक स्कूल बराडगाव , राजश्री शाहू महाराज माध्यमिक शाळा गुजरी येथे NAS च्या टीमने भेट दिली व अशाच प्रकारे इतर शाळांमध्ये असाच उपक्रम करण्यात आला.