Now Loading

राळेगाव आठवडी बाजारात शिस्त लावण्यात अधिकारी हिरिरीने समोर आले === ●मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास ● ●पार्किंग व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था●=

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतले तर चांगल्या गोष्टी अवघ्या काही तासात च बघाययास मिळतात.याचा प्रत्यय काल शुक्रवार बाजार दिवशी नागरिकांनी अनुभवला आहे. पोलिस स्टेशन राळेगांव चे निरिक्षक संजय चौबे व त्यांचे सहकारी सह नगर पंचायत राळेगांव चे राहूल मारकड व कर्मचारी यांनी सर्व दुकानदारांना मुख्य रस्ता सोडून आंत मध्ये बसविले आणि सर्व व्यवस्थित सुरु झाल आहे हे विशेष. येथील आठवडी बाजारात शिस्त पाहायला मिळाली दिवाळीच्या दिवशी भरलेल्या बाजार वाहतूक व्यवस्था रस्त्यावर करणारा बाजार यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 पूर्णपणे बाजार च्या दुकान मुळे भरला असायचा यावेळी हा रस्ता पूर्णपणे मोकळा असल्यामुळे सुरळीत वाहतूक सुरू होती पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांनी दक्षता घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवाळीच्या दिवशी येथील 13 वर्षीय मुलगी संस्कृती धुमाळे तिचा मृत्यू झाला होता त्यावेळी अपघाताची कोंडी होऊन हा मृत्यू झाल्याचा आरोप जनतेतून झाला होता त्यामुळे पोलीस प्रशासन व नगर पंचायत प्रशासन यांनी आठवडी बाजार सुरक्षित व सुरळीत चालावा याकरिता जातीने लक्ष घालून नियोजन केले पोलीस निरीक्षक संजय चौबे नगरपंचायत चे कक्ष अधिकारी राहुल मारकड यांनी पार्किंग स्वच्छतागृह ची व्यवस्था दुकानात ची जागा निश्चित करून दिल्यामुळे रावेरी पाईट ते क्रांती चौक हा रस्ता पूर्णपणे मोकळा होता यामुळे गणेश नगर. फाळके लेआऊट. नवीन वस्ती. गांधी लेआउट या परिसरातील नागरिकांना शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्याचे सोयीचे झाले मात्र वाहतूक पोलीस यांची उपस्थिती नव्हती प्रत्येक बाजारच्या दिवशी वाहतूक पोलीस येथे हजर राहत नाही अशी नागरिकांची ओरड आहे.अशीच व्यवस्था दर शुक्रवार बाजार दिवशी ठेवली तर सर्वांच्या दृष्टीने सोईस्कर राहील...