Now Loading

राज्यमंत्री तनपुरे यांचा कोसे यांच्या नेतृत्वात सरडपार येथे जंगी स्वागत

सिंदेवाही- ऊर्जामंत्री तनपुरे हे दिनांक 13 नोव्हे चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना नागभीड येथे जनता दरबारात सहभागी होण्याकरिता जात असतांना सरडपार येथे अंबादासजी कोसे कार्यकारी तालुका अध्यक्ष राकांपा सिंदेवाही यांच्या नेतृत्वात जंगी स्वागत करण्यात आला. प्रथमत: बुद्धविहार सरडपार येथे राज्यमंत्री तनपुरे यांना पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आला व कार्यकर्तांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करुन राज्यमंत्री पुढे सिंदेवाहीकडे निघाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक चे जिल्हाध्यक्ष नितिन भाटारक हे प्रामुख्याने उपस्थित होते. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदेवाही चे कार्यकारी तालुकाध्यक्ष अंबादासजी कोसे, दामोदर नन्नावार, डांगे, जांभूळे, शेषराव चौके, गुलाब बगडे, ईश्वर भेंडारे, हरिश्चन्द्र बारसागड़े, किशोर मोहूर्ले, शेषराव मेश्राम, शालीक कामडी, विक्की साखरे आदि कार्यकर्ता उपस्थित होते.