Now Loading

आर्णी न.प.महिला उपसभापतींची आत्महत्या

  आर्णी नगरपालिकेच्या विद्यमान उपसभापती सुरेखा मोहन मेंडके वय ३५वर्षे यांनी राहत्या घरी रविवारी 14नोव्हेंबर ला दुपारच्या वेळेस गळफास लावून आत्माहत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेखा मेंडके यांनी काँग्रेस कडून प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणुक लढवली व विजयी झाल्या होत्या. विद्यमान महिला व बालकल्याण उपसभापती म्हणुन काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नगरसेविका सुरेखा मेंडके या आर्णी येथील नारायणलीला ले आऊट मध्ये रहात होत्या. मात्र रविवारी दुपारच्या दरम्यान रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास आर्णी पोलिस यंत्रणा करीत आहे.