Now Loading

बहुरूपी कलावंतांवर उपासमारीची वेळ

संवाद फेरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाबरोबरच मनोरंजन करणारा बहुरूपी याचा कलाप्रकार काळानुरूप लोप मागत चालला आहे. काळी एक दोन बहुरूपी दिसून येतात परंतु त्यांना पाहिजे तसे प्रोत्साहन लोकांकडून मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  बहुरूपी कलाप्रकाराला समाजात एकेकाळी मोठे बलय होते. समाजातील विविध घटकांची सोगे घेऊन दोन-चार मिनिटांच्या संवादफेरीतून मनोरंजन करणारा बहरूपी कधी डॉक्टर, वकील अभियंता तर कधी पोलीस अधिकारी असे नवनवीन मुखगटे चढवून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, हजरजबाबी व बोलण्यातील लकब असल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार व जनतेची तेवढीच दाद मिळवून घेणारा हा बहुरूपी वर्षानुवर्ष ही कला सादर करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.