Now Loading

शाळा सुरू एसटी बंद तात विध्यार्थ्यांचे हाल एसटीच नाही तर शाळेत कसं येऊ गुरुजी?

मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे विद्याव्यचि मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू झाल्या मात्र  दिवाळीची सुटी संपली आणि आता एसटीचा संप सुरू झाला. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा मार्गच बंद झाला आहे. एसटीच नाहीतर शाळेत कसे देऊ गुरुजी असे म्हणण्याची वेळ सध्या विद्यार्थ्यावर आली आहे दरम्यान पालकांची चिंता आणखी वाढली आहे. विद्यार्थ्यांना गावात शैक्षणिक सुविधा नसतात. अशा वेळी मोठ्या गावात किंवा शहरात येऊन त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागते. यासाठी हक्काची एसटीची साथ नेहमी त्याच्या पाठीशी असते मात्र मागील काही दिवसापासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचा प्रश्न उभा झाला आहे त्यामुळे एसटीच्या संपू सुटावा अशी प्रार्थना सध्या विद्यार्थी करीत आहेत.