Now Loading

समता परिषदेच्या वतीने तायडे यांचा सत्कार

काँग्रेस च्या ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी येथील अजय काशीराम तायडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा बुलडाणा जिल्हा समता परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष .सुभाष राऊत, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रा.अरविंद गाभणे, दलितमित्र माधववराव हुडेकर, समता परिषदेचे राज्याचे सल्लागार प्रा. सदानंद माळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता खरात, संघटक संजय देवकर, प्रल्हाद सातव, माळी समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मधुसुदन सपकाळ, संजयर वानखडे, मोताळा येथील भूषण वानखडे, विनोद इंगळे, गजाननराव भोपळे, ज्ञानदेव हरमकार, सुनील डहाके, मलकापूर येथील अमोल राऊत, रवींद्र भोपळे, अमोल बगाडे, भागवत वाघमारे, पंकज देविकार, दीपक सातव, गणेश गवळी, विनायक सातव, संतोष घाटे, नांदुरा येथील श्याम राखोंडे, निव्रुत्ती इंगळे, गोपाल सातव, गजानन वानखडे, पातुर्डा येथील अनंत सातव, पिंपळगावराजा येथील सचिन वानखडे, सुरेश बगाडे, सुटाळा येथील उपसरपंच जयेश वावगे यांच्यासह जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.