Now Loading

कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित ! शेतकरी त्रस्त

खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतातील कृषिपंपांना होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. पेरणी झाल्यानंतर पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. खामगाव तालुक्यातील बोरी, अडगाव, बोथाकाजी, टेभुर्णी, आंबेटाकळी, शहापूर गावात सिंचनाची व्यवस्था आहे. या भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पेरणी केली आहे. तसेच पिंपळगाव राजा, वसाडी भागात भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहे.