Now Loading

फुले उचलून साफसफाई करा

दिवाळीनिमित्त खामगाव शहरात ठिकठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. दिवाळीनिमित्त खरेदी करण्यात येणाऱ्या रांगोळी, लाह्या फुटाणे, झाडणी व फुलांची दुकाने लावण्यात आली होती. दिवाळीनिमित्त शहर पोलीस स्टेशन ते जलंब नाकापर्यंत फूल विक्रेत्यांनी दुकाने थाटलीहोती. अनेक दुकाने लागल्याने विक्रेत्यांकडे फुले शिल्लक राहिली. त्यांनी ती फुले त्याच ठिकाणी टाकली. सध्या ती फुले सुकली असल्यामुळे हवा आल्यावर सर्वत्र उडत आहे. परिणामी, सर्वत्र कचरा होत आहे, तसेच काही ठिकाणी पाण्यामुळे फुले कुजत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन साफसफाई करण्यात यावी अशी मागणी खामगाव येथील विजय काळे यांनी नगर पालिके कडे केली आहे.