Now Loading

बसस्थानक परीसरात वकीलावर प्राणघातक हल्ला यवतमाळ बार असोसिएशनचे सदस्य धडकले पोलीस ठाण्यात

घरी जात असलेल्या बकीलावर कारण नसताना प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आर्णी रोडवरील नवीन बसस्थानक परीसरात घडली अर्जदार हर्षवर्धन दिलीप देशमुख रा. राणाप्रताप गेट बडगाव हे आज सायंकाळी त्यांचे वाहन क्रमांक एम. एच. १२ डी.ई.२०९८ या वाहनाने आर्णी रोडने त्यांचा मित्र अजय डाखोरे यांना त्यांचे घरी सोडुन देण्यास जात असताना वाहन क्रमांक एम.एच. १४ एफ. एम.७१२७ या वाहनाद्वारे चालक कुणाल सप्रे याने पाठलाग करून आर्णी रोडवरील नवीन बसस्थानक तक्रारदाराचे वाहन रस्त्यात अडवुन हर्षवर्धन दिलीप देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये हर्षवर्धन देशमुख यांच्या डाव्या डोळ्याच्या वर लोखंडी रॉडचा जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला त्यानंतर प्रसंगावधान राखुन हर्षवर्धन देशमुख यांनी कारचे गेट बंद केल्याने गैरअर्जदार कुणाल सप्रे यांनी वाहनावर लोखंडी रॉडने मारून वाहनाचे नुकसान केले त्यावरून आज हर्षवर्धन दिलीप देशमुख यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात येवून गैरअर्जदार सप्रे नामक इसमाविरूद्ध तक्रार दिली त्यावरून विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहीती यवतमाळ बार असोसिएशन ला मिळताच बार असोसिएशनच्या अध्यक्षासह सर्व सदस्य अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आले होते.