Now Loading

आज पासून तालुक्यात क्षयरुग्ण शोधमोहीम

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात क्षयरुग्ण शोधमोहिमेला प्रारंभ होणार आहे. १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत हि मोहीम चालणार आहे. या मोहिमेत क्षयरोगाचे निदान होण्यापासून अद्यापही वंचित असणाऱ्या सर्व संशयित क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणा या व्यक्तीचे रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. संशयित क्षयरुग्णांचे रोगनिदान आरोग्य संस्थेतील प्रयोगशाळेमार्फत करण्यात येते. संशयित क्षयरुग्णाची लवकरनिदान झाल्यास प्रभावी आषधापचार सुरू करून रुग्ण हा लवकरबरा होतो. यासाठी या मोहिमेचालाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग करीत आहे. शहरी व ग्रामीण भागातील जोखमीचा क्षेत्रात, ठिकाणी तयार केलेल्या कृती आराखड्याद्वारे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक यांचे पथकाद्वारे दररोज घरांना गृहभेटी दिल्या जातील. क्षयरोगाची लक्षणे असणा या व्यक्तींना शोधणे, त्यांची थुकी नमुने तपासणी, एक्स-रे तपासणी आवश्यकतेनुसार सीबीनेंट तपासणी व इतर तपासण्या करून क्षयरोगाचे निदान करणे व क्षयरोगावरील औषधोपचार सुरू करणे, प्रत्यक्ष क्षयरुग्ण उपचार मोहीम खामगाव तालुक्यात राबविण्याकरिता, तसेच जनतेने क्षयरोगाबाबत तपासणी करून घ्यावी,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.