Now Loading

आक्षेपार्ह मजकूर स्टेटस वर ठेवणेही भोवले :

*सोशल मीडियाच्या पोस्टवर पोलिसांचा वॉच* *व्हिडीओ फोटो अपलोड करणाऱ्यांवर कारवाई* *शांततेचे केले पोलिसांनी आवाहन* बुलढाणा : : त्रिपुरा येथील घटनेसंदर्भात शुक्रवारी राज्यातील काही शहरांमध्ये अल्पसंख्याक समाजाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाने हिंसक वळण घेतल्यानंतर काही ठिकाणी दंगली घडल्या सध्या या सर्व ठिकाणी शांतता असून पोलिसांनी कर्फ्यू लागलेला आहे असे असताना इतर शहरांमध्ये या दंगलींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून इतर शहरातील वातावरण दूषित करणाऱ्यांविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई सुरुवात केली आहे. यामध्ये शेगाव शहरात सकाळपासून ५ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आले आहे. अमरावती व इतर शहरांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नवनवीन अफवा सोशल मिडियावर पसरवल्या जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहेत. व्हॉटस अँपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपच्या अँडमिनवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य पोलिसांनी स्पष्ठ केले आहे. त्यामुळे आपण जर कोणत्या व्हाँट्स ग्रुपचे अँडमिन असाल तर त्वरित सेटिंगमध्ये जाऊन संबधित ग्रुपच्या सेटींगमध्ये जाऊन त्या ग्रुपवर तुम्हीच फक्त मेसज करू शकता, असे सेटींग करा असे आवाहन केले आहे. व्हाट्सअँप च्या ग्रुपमधील उपद्रवींकडून पसरवण्यात आलेल्या अफवांना ग्रुप अँडमिनला सामोरे जावे लागाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात आज सकाळ पासून एकूण ५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.