Now Loading

पोलीस कमिशनर बदमाश याचा अर्थ संपूर्ण पोलीस बदमाश नाही सांगत बुलडाणा अर्बनला सोमय्यांची 'क्लिन चिट' ! बुलढाणा अर्बन ला दिली भेट

बुलढाणा : माझा मुद्दा मी फार स्पष्ट केलेला आहे. कि पॉलिटिकल भष्ट्राचारात हे पॉलिटिकल लीडर अग्रेसर आहेत. महाराष्ट्र सरकार किंवा मुबई पोलीस खराब आहे.असे म्हणता येणार नाही मुबई पोलीसमधील एक अधिकारी बदमांश निघाला तो उध्दव ठाकरेंनी नियुक्त केला होता.येवढा चागला पोलीस कमिशनर दोन महिन्यात 17 कम्प्लेट त्याच्या विरोधात ठाकरे सरकारने केल्या .तर त्याचा अर्थ की मुंबईची सगळी पोलीस बदमाश आहे.असं नाही होत.म्हणजे बदमाश आहे त्यांच्यावर कारवाई करावी.समझा उद्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या शाखेत किंवा गावात काही गोंधळ झाला.तो गोंधळ आणि घोटाळा हँडल झाला पाहिजे. मी बुलडाणा अर्बन पतसंस्थेत जाऊन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची भेट घेतली.त्यांनी सांगितलं की आयकर विभागाची चौकशी झालेली आहे. आणि आम्ही आयकर विभागांना पूर्ण सहकार्य करीत आहोत असे सांगून किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त केला आहे. त्यामुळे सोमय्या यांनी बुलडाणा अर्बनला क्लीन चिट दिलीय असेच दिसत आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना कर्ज दिल्या प्रकरणी आयकर विभागाने बुलडाणा अर्बनच्या शाखेवर पडताळणी करून खळबळ उडवून दिलीय होती.. तर किरीट सोमया यांनीही 1200 खात्यामध्ये कागदपत्रे कमी असलयाने त्यातील 54 कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याने ती खाती होल्ड ठेवल्याने आज शुक्रवारी 12 नोव्हेंबर रोजी बुलडाणा अर्बन पतसंस्थेत भाजप नेते किरीट सोमया हे बुलडाणा मध्ये आले होते.. तर सोमया यांनी पतसंस्थेत जाऊन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची भेट घेतली आणि सर्व प्रकरणाची माहिती घेतली असून ती माहिती मिळाली असल्याचे सोमय्या यांनी सांगितलंय.. तर आयकरला सुद्धा सहकार्य करणार असल्याचे बँकेने सांगितलंय.. त्यामुळे त्यांचे समाधान झालंय असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी दिली.