Now Loading

*रेड डॉट उपक्रमाबद्दल*

रेड डॉट जागरूकता कार्यक्रम वापरलेले पॅड आणि डायपरची सुरक्षित विल्हेवाट लावण्याचे लक्ष्य आहे. न गुंडाळलेला सॅनिटरी कचरा, कचरा वेचकांना स्टॅफिलोकोकस, हिपॅटायटीस, ई कोलाय आणि सॅल्मोनेलासह अनेक घातक रोगजनकांच्या संपर्कात आणतो. *तुम्ही या उपक्रमात कसे सहभागी होऊ शकता..?* आपल्या घरातील वापरलेले सॅनिटरी पॅड आणि डायपर कॅरी बॅग किंवा पेपर मध्ये गुंडाळून फेकण्याऐवजी, पेपर बॅग मध्ये टाकून पण त्यावर रेड डॉट चे चिन्ह काढून फेकावा. *यामुळे काय होईल ?* रेड डॉट असलेली पेपर बॅग पाहिल्यावर सफाई कर्मचाऱ्यांना लगेच समजेल यात वापरलेले सॅनिटरी पॅड किंवा डायपर आहेत आणि हा कचरा सहज वेगळा करता येईल, याने कचरा विलगीकरण सोपे होईल. ज्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे व तसेच पर्यावरणाचे पण रक्षण होईल. *या विषयावर आधारित एका मिनिटाची ऍड फिल्म आम्ही केली आहे.* *कृपया लिंक पहावी आणि share पण करावी. तसेच आपल्या घरी वापरलेले सॅनिटरी पॅड आणि डायपर फेकण्यासाठी रेड डॉट असलेल्या बॅग चा वापर करावा हे नम्र आवाहन.* *संकल्पना :* *विनोद डावरे* *कलाकार :* *डॉ संपदा देशमुख, मृणाल कुलकर्णी* *छायांकन : श्रीरंग टाकळकर* *संकलन : अमोल लंगर* *दिग्दर्शन : रवि पाठक*