Now Loading

लोक मेले तरी चालतील पण राजकारण चालले पाहिजे हीच भाजपची भूमिका - नाना पटोले

कोरोना मध्ये हजारो लोकांना पायदळ चालवण्याचे पाप भाजपाने केले. कोरोना कमी झाला म्हणून दिवाळी साजरी करायला गेले. तेव्हा एसटीचा संप पुकारून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे या भाजपाच्या नेत्यांना लोक मेले तरी चालतील पण त्यांच राजकारण चालले पाहिजे अशी भूमिका असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी काँग्रेसचे महासचिव तारीक अन्वर हे सुद्धा उपस्थित असून त्यांनीही भाजपवर निशाणा साधला. आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांचे नसून भाजपचे सत्तेत असतांना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये सामावून घेण्यास नाकारले. राजकीय पोळी शेकण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. यामध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, ज्या पद्धतीने इतर महामंडळामध्ये खाजगीकरण झाले आहे. त्याच पद्धतीने एसटी महामंडळाचे सुद्धा व्हावे. यावर राज्याचे परिवहन मंत्री यांनी सांगितले. पण त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. मात्र, भाजपचे आमदार नेते ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ देऊ पाहत नाही, हे आंदोलन आता एसटी कामगारांचे राहिले नसून भाजपचे आंदोलन झाले आहे असाही आरोप नाना पटोले यांनी केला आहे.पेट्रोल पाच रुपये नाही तर 60 रुपये लीटर कमी करा काँग्रेसच्या वतीने आजपासून पेट्रोल दरवाढ आणि महागाई विरोधात जण जागरण यात्रा सुरू झाली आहे. केवळ पाच रुपये कमी केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. अजूनही केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलवर भरमसाठ टॅक्स लादला जात असून जनतेची लुट सुरू आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर पाच रुपये कमी करून चालणार नाही तर साठ रुपये प्रति लिटर कमी करावे अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने केली जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. हिंदू-मुस्लिम दंगे करवणे हीच भाजपाची रणनिती त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसचे माहाससचिव तारीक म्हणाले त्रिपुरा मध्ये भाजप सरकार सत्तेत आहे. दंगे करणे आणि वोट घेणे हा भाजपचा वर्ल्डवाइड प्रोग्राम आहे. हे आजपासून नाही 2014 पासून असेच सुरू आहे. पद्धतीने हिंदू-मुस्लिम दंगे करवणे आणि त्याचा राजकीय फायदा पदरात पाडून घेणे हीच भाजपची रणनीती आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. काँग्रेसचा विचार हा सर्वधर्म समभावाचे असून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची विचारधारा आहे. सर्व संघटनावर प्रतिबंध आणा विश्व हिंदू परिषदेने रझा अकादमीवर प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे महासचिव तारिक अन्वर म्हणाले फक्त रजा आकादमीच का हिंदू मिशन, बजरंग दल यावर ही बंदी घातली पाहिजे. ज्या दंगली घडवतात आणि दंग्यात सहभागी होतात त्या सगळ्या संघटनांवर कारवाई झाली पाहिजे असेही काँग्रेसचे महासचिवव तारीक अन्वर म्हणाले.