Now Loading

एनडीएमजी च्या जिल्हा अध्यक्ष पदी प्रशांत डोंगरदिवे

चिखली:- नॅशनल दलीत मुव्हमेट फाॅर जस्टीज चा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा कल्याण मुंबई येथे चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्टवादी नेते प्रशांत डोंगरदिवे यांचे सामाजिक कार्याची दखल घेत देश पातळीवर दलीत पीडीत शोषीतांना न्यान देणारी सामाजिक संघटना नॅशनल दलीत मुव्हमेट फाॅर जस्टीज च्या बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी प्रशांतभैया डोंगरदिवे यांची नियुक्ती राज्य महासचीव अॅड डाॅ केवलजी उके यांनी केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रिय राज्य मंत्री सामाजिक न्याय विभाग रामदास आठवले यांचे शासकीय स्विय सहायक प्रविण मोरे हे होते तर मार्गदर्शक अनुसुचित जाती जमाती आयोगाचे सदस्य किशोर मेढे प्रमुख उपस्थिती एनडीएमजी चे प्रदेश महासचिव तथा महिला बाल कल्याण राज्यस्तरीय शासकीय समीतीचे सदस्य अॅड,डाॅ. केवल उके, प्रदेश सचिव वैभव गीते, प्रदेश सहसचिव पी.एस. खंडारे, अॅड बी.जी. बनसोडे, उद्योजक दिनेश जाधव हे होते यावेळी प्रदेश व विभागीय कार्यकारीणी चे नुतनीकरण करण्यात आले. विदर्भ सचिव पदी भारत गवई, विदर्भ संघटक प्रशांत झीने, विदर्भ विधी सल्लागार अॅड. रविंद्र एकडे, अॅड. रुचीता जाधव तसेच बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी प्रशांतभैया डोंगरदिवे यांची निवड करण्यात आली. देशात राज्यात ठीक ठीकाणी दलीतांवर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडुन न्यायासाठी न्यायालयीन दरबारी संघर्ष करण्याचा मानस सर्व नवनियुक्त पदाधीकारी यांनी समोर ठेवुन संघटनेला मजबुत करावे असे आवाहन प्रदेश महासचिव अॅड केवल उके यांनी केले. यावेळी  सौ आशाताई कस्तुरे, कल्पनाताई केजकर, प्रतीभाताई गवई, विनोद सोनटक्के, सुरज अवसरमोल,अनंता वानखेडे, विकास मुळे, प्रेमानंद सरकटे, प्रशांत जाधव हे उपस्थीत होते.