Now Loading

माझ्यावर हल्ला माजी आमदार राहूल बोन्द्रे व कुणाल बोन्द्रे प्राचार्य नन्हई यांनीच केला                 शाम वाकतकर

चिखली ÷ माझ्यावर केलेला भ्याड व जीवघेणा हल्ला माजी आमदार राहुल बोन्द्रे, कुणाल बोन्द्रे आणि अनुराधा कॉलेजचे प्राचार्य नन्हई यांनीच केलेला आहे .         आज दि 14 /11 /2021 रोजी सकाळी 9 वाजता गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जात असताना जगदंबा मोबाईल शॉपी , सिमेंट रोड येथे तीन जणांनी अचानक येऊन माझ्यावर भ्याड व जीवघेणा हल्ला केला . हल्ला करत असताना त्यांनी आईबहिणींवरून शिवीगाळ ही केली . हल्लेखोरांनी मोठा दगड उचलून डोक्यात टाकत असतांना सुदैवाने स्वप्नील पुरुषोत्तम लढ्ढा व पुरुषोत्तम देवमाने व इतर लोक धावल्याने हल्लेखोर पळून गेले . अन्यथा आज माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले असते .          माझ्यावरील हल्ल्यामागे माजी आमदार राहुल बोन्द्रे , नगराध्यक्षा सौ बोन्द्रे यांचे पती कुणाल बोन्द्रे आणि अनुराधा कॉलेजचे प्राचार्य नन्हई यांनीच हल्ला केलेला आहे .  याचे कारण मी अगोदर माजी आमदार राहुल बोन्द्रे यांचा कार्यकर्ता होतो . परंतु मतभेद झाल्याने मी भाजपात प्रवेश घेऊन मा आ सौ श्वेताताई महाले यांचे काम केले . याचा राग मनात ठेवून माजी आमदार यांनी माझा पाल्य रोहीत गजानन वाकदकर हा चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरहा पदवी अभ्यासक्रम सन २०२०-२०२१ मध्ये उत्तीर्ण झाला असुन मी व माझा पाल्य रोहीत गजानन वाकदकर दिनांक २०/०९/२०२१ रोजी अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये टि.सी. व मार्कशिट आणण्याकरीला गेलो. महाविद्यालयामध्ये टि.सी. व मार्कशिटची मागणी केली असता संबंधीत विभागाचे प्राध्यापक व क्लार्क यांनी प्राचार्यांना भेटण्याची तोंडी सुचना केल्यावरुन आम्ही प्राचार्यांना भेटण्याकरीता त्यांचे कार्यालयामध्ये गेलो परंतु त्यावेळी प्राचार्य हजर नसल्यामुळे परत दिनांक २३/०९/२०२१ रोजी मी व माझा पाल्य त्याची टि.सी. व मार्कशिट मिळावी त्याकरीता विनंती अर्ज घेवुन दुपारचे वेळी प्राचार्यांचे कार्यालयात गेलो व त्यांना रितसर अर्ज देवुन त्याची पोच मागितली असता प्राचार्यांनी आम्हाला पोच देण्यास ढायटाळ केली व हे खासगी महाविद्यालय आहे असे म्हणत सुरक्षारक्षकांना बोलावुन मला व माझे पाल्याला हाकलवुन लावले. महोदय, हा प्रकार येथेच थांबला नाही, त्यानंतर प्राचार्यांनी गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावुन आम्हाला धमकावण्यास सुरुवात केली. तसेच प्राचार्यांनी पोलीसांना बोलावुन उलट आमचेविरुध्द तक्रार देण्याची धमकी दिली.          याबाबत मी महामहिम राज्यपाल यांचेकडे अनुराधा कॉलेजची  तक्रार केलेली आहे . सदर तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी महामहिम राज्यपाल यांनी कुलगुरू अमरावती विद्यापीठ  यांना पत्र लिहून कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केलेले आहे .          तसेच नगराध्यक्षा सौ बोन्द्रे यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहे . हाच राग मनात ठेवून माजी आमदार राहुल बोन्द्रे आणि कुणाल बोन्द्रे यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे . भविष्यात माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास माजी आमदार राहुल बोन्द्रे, कुणाला बोन्द्रे व प्राचार्य नन्हई हेच जबाबदार राहतील .