Now Loading

बुलडाणा बालसुधारगृहातून खामगावातील दोन गुन्हेगार फरार

बुलडाणा येथील बालसुधार निरिक्षण गृहातून दोन गुन्हेगार फरार झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही गुन्हेगार खामगावातील आहेत. नेहमीप्रमाणे शनिवार १३ नोव्हेंबर रोजी बुलडाणा बालसुधारगृहाच्या अंगणात निरीक्षणगृहातील मुलं खेळत होती. यावेळी गोंधळाचा फायदा घेत यातील शुभम संतोष चांदूरकर(२५)रा.वाडी व शिवा मोहन धारपवार (२३)रा.दाळफैल हे दोघे किचनच्या दरवाजाचे नट काढून मागील भिंतीवरून उडी मारून पसार झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.अल्पवयीन असतांना केलेल्या गुन्ह्यात या | दोघांना ब लसुधारनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. अशी माहिती मिळाली आहे. या घटनेवरून बालसुधारगृह्यच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रशचिन्ह उपस्थित होत आहे.