Now Loading

दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडीओ व्हाट्सअप वरून प्रसारित करणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा

दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडीओ व्हाट्सअप वरून प्रसारित करणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा सोलापूर : दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणारा रिक्षाचालक सलीम अब्दुल रजाक शेख उर्फ कुमठे (वय 44 राहणारा शास्त्रीनगर) त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल शब्बीर मेहबूब तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे. सलीम याने दोन समाजात तेढ निर्माण करणारा व्हिडीओ सोशल मीडिया मधून प्रसारित केल्याची माहिती सदर बाजारच्या गोपनीय पथकाला मिळाली. या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सलीम शेख याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली त्यावेळी त्याच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळला या व्हिडीओ ची चौकशी केली असता हा व्हिडीओ त्याच्याकडे ुसर्‍या ग्रुप मधून आल्याचे त्यांनी माहिती दिली आणि हा व्हिडीओ आपण तीन ते चार जणांना पाठवले याची माहितीही त्यांनी दिली यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलिस करत आहेत