Now Loading

गुंजेवाही येथील मोतीबिंदू शिबिरात १०५ रुग्णांची शस्त्रक्रियेकरिता निवड

जि. प. सदस्य श्री. रमाकांत लोधे यांचा मोतीबिंदू उच्चाटनाचा मागील १५ वर्षाचा अखंडित प्रवास चंद्रपूर- जिल्ह्यात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तथा रक्तदान शिबिरांची एक लोकचळवळ उभी करणारे व्यक्तिमत्व म्हणून जि. प. सदस्य श्री. रमाकांत लोधे यांची विशेष अशी ओळख आहे. मागील सातत्याने १५ वर्षापासून अखंडितपणे मोतीबिंदू शिबिरांच्या माध्यमातून १३,५०० रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे महत कार्य श्री. रमाकांत लोधे यांचे हस्ते झाले आहे. मागील २ वर्ष कोरोना महामारीमुळे या कार्याला काहीसा खंड पडला परंतु आता परिस्थिती थोडी निवळली. सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना मुभा मिळाल्याने श्री. रमाकांत लोधे यांनी सिंदेवाही तालुक्यातील मौजा गुंजेवाही येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेज, लायन्स क्लब चंद्रपूर, श्री. गुरुदेव सेवा मंडळ, गुंजेवाही, तालुका काँग्रेस कमिटी, सिंदेवाही आणि श्री. रमाकांत लोधे मित्र परिवाराच्या वतीने नुकतेच भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले. सदर शिबिरात ५१५ रूग्णांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली आणि १०५ रुग्णांची शस्त्रक्रिये करीता निवड करण्यात आली. शिबिराच्या उदघाटनिय कार्यक्रमाला श्री. रमाकांत लोधे जि. प. सदस्य, अध्यक्षस्थानी सरपंच श्री. वसंत टेकाम, प्रमुख उपस्थिती जि. प. सदस्या सौ. रूपाताई सुरपाम, पंचायत समिती सदस्य श्री. राहुल पोरेडीवार, श्री. चंद्रशेखर चन्ने, श्री. बुरबादे आणि इतर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे मुख्य आयोजक व संयोजक श्री. रमाकांत लोधे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन श्री. मंगेश मेश्राम ग्रा. प. सदस्य यांनी केले. शिबिराच्या उभारणी करिता लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत जोशी, सचीव श्री. दिलीप चांडक, कार्यवाहक श्री. दिनेश बजाज आणि सेवाग्राम नेत्र रुग्णांलयाचे डॉ. अजय शुक्ला आणि चमू यांनी सहकार्य केले. सोबतच शिबिराच्या यशस्वीतेकरीता श्री. गुरुदेव सेवा मंडळ, गुंजेवाहीचे पदाधिकारी, श्री. इम्रान पठाण ग्रा. प. सदस्य, श्री. भूषण कोरेवार, श्री. वासुदेव दडमल ग्रा. प. सदस्य, श्री. कपिल मेश्राम, श्री. वामन जीवतोडे, श्री. माणिक गेडाम, श्री. टिकेश कुंभरे, श्री. राजू पात्रे यांनी मेहनत घेतली.