Now Loading

बिरसा मुंडा यांना प्रशासनातर्फे अभिवादन

बारामती : आदिवासी समाजक्रांतीचे जनक व स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालया मध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिल कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.