Now Loading

IMD: केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि 8 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

भारतीय हवामान खात्याने (IMD) 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. सध्या केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील केरळ राज्य शनिवारपासून मुसळधार पावसाशी झुंज देत आहे. हवामान खात्याने सोमवारी केरळमधील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, मंगळवारसाठी 8 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे येथील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे.