Now Loading

भा.ज.प चे जोडे उचलुन थकले डॉ.गोडे.. अखेर काँग्रेस प्रवेश करून दामटले घोडे...

वर्धा भा ज प चे जिल्हा अद्यक्ष डॉक्टर श्री शिरीष गोडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यांचा भा ज प प्रवेश झाला तेव्हाच जनतेला भाकीत होते "गोडे उचलणार भा. ज. प. चे जोडे " आणी हेच झाले सालस स्वभाव आणी अत्यन्त प्रामाणितकता राजकारणात चालत नाही याचे हे उदाहरण आहे. मुळात डॉक्टर आणी सुसंस्कारी माणुस म्हणुन डॉक्टर गोडे यांच्या या जाण्याने अनेकांना दुःख झाले म्हणतात . मात्र यांच्या येण्याने मात्र काँग्रेस पक्षातही नक्कीच काहींना दुःख होण्याची शक्यता आहे. भा ज प प्रवेशानंतर डॉक्टर गोडे हे विधानसभा उमेदवार असेल अशी चर्चा होती मात्र तसे झाले नाही. त्या वेतिरिक्त पंकज भोयर हे काँग्रेस सोडुन आलेले दुसरे डॉक्टर आमदार झाले. दोघेही डॉक्टर मात्र फरक इतकाच की एक डॉक्टर माणसावर इलाज करणारे आणी दुसरे इलाज बघणारे. या काळात दोन निवडणुका झाल्या मात्र गोडेंच्या हाती काहीही लागले नाही. शेवटी भा ज पचे कारकुनी पद संभाळून थकलेले गोडे आज काँग्रेस पक्षात आले. वास्तविक हे भा ज पला भारी पडु शकत. आणी अचानक गोडे कसे दामटले याची चिंता मात्र भा ज प तंबूत असेलच वर्धा विधानसभा ही जातीची निवडणुक म्हणुन होत आली आहे. आणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर सतत निवडणूक जिंकनारे स्वर्गीय प्रमोद शेंडे यांना मोठया प्रमाणात कुणबी मते मिळायचे मात्र ते शेखर शेंडे यांच्या संदर्भात न झाल्याचे कारण भा ज प चे उमेदवार हे कुणबी होते आणी तेली समाजात मते विभागली गेली तसेच मोदी लाट याचाही असर झाला आणि काँग्रेस चा सतत पराभव झाला . आज ज्या जिल्ह्यातुन काँग्रेस जन्माला आली तिथे एकच आमदार असल्याची ही खंत सर्वांनाच आहे. आणी या प्रवेशात मोठे राजकारण उघड दिलेत असुन आगामी निवडणुकीत वर्धा विधानसभा ही गोडे यांची असेल असे चित्र आहे.आणि या जागेला शेंडे यांनी आपला जोर लावला तर शेंडे हे सुद्धा मागील दारातून आमदार होतील मात्र यात असे होईल तो वेळ कोणता. आमदार पंकज भोयर यांच्या पराभवाचे कारण गोडे होण्याची ही फिल्डिंग मात्र मजबुत होऊ शकते. मात्र यात शेंडे गट दुःखी असल्याचे दिसुन येते. आणी शेंडे यांनी विरोध करावा हेच भा ज प ला हवे. एकीकडे डॉक्टर जोडे उचलून दुःखी झाले आणी काँग्रेस पक्षात आले त्यांच्या येण्याने शेंडे जर दुःखी झाले तर दोन दुःखी एक करण्याचे काम दत्ताजी करतातच आणी शेंडे यांनी जर भा ज पचा शेला पांघरला तर परत गोडे यांचे दुःख कायम ... मात्र हे गणीत जरी कठीण वाटत असले तरी राजकारणात धुरंदर समजले जाणारे आणी नागपूर जिल्ह्यात आपला झेंडा न झुकू देणारे पालकमंत्री सुनील केदार याला अगदी अलगद सोडवतील यात शंका नाही आज या प्रवेशाने मोठी समीकरणे उभी झालीत हे मात्र तितकेच खरे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले मुळे बरेच काँग्रेस चे नेते घर वापसी आले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नानाभाऊ पटोले हे करिष्मा दाखवतील असे सध्या तरी चित्र दिसत आहे. नानाभाऊ मुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याची जनसामान्यात चर्चा आहे.