Now Loading

धानोरा नगरी येथे श्रीकृष्णाची नगरी व श्रीमद भागवत समाप्ती

राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे चातुर्मास समाप्तीच्या निमित्ताने ह भ प भागवताचार्य संदिप महाराज सांगळे यांच्या सुमधुर वाणीतुन हा संगीतमय श्रीमद भागवत कथा सुरु आहे या निमित्ताने गावकर्‍यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते साथीला गायनाचार्य ह भ प धोंडबा महाराज गरुड ,ह भ प शरद महाराज आळंदीकर, तबला वादक ह भ प गौरव महाराज लढी, आँर्गन वादक ह भ प गोपाल महाराज मोहे, ह भ प गणेश महाराज दरोडे, ह भ प सागर महाराज नांदुरकर गेल्या सात श्रीमद भागवत सात दिवसांपासून चालू होते व आज दिनांक 16/11/2021 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा अशी श्री हनुमान मंदिर देवस्थान व समस्त गाववासी करत आहे.