Now Loading

बेंबळाचे पाणी शेतात शिरल्याने चना पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,खडकी येथील घटना

राळेगाव तालुक्यातील खडकी येथील शेतकरी देविदास आडकुजी तेलतुंबडे गट नंबर ५४/२ शेती तीन एकर या शेतकयानी आपल्या शेतात तीनही एकर मध्ये संपूर्ण चना पेरला होता पण अचानक बेंबळाचे पाणी येवून शेतात शिरले व तीनही एकर निघालेला चना जलमय झाला. शेतात इतके पाणी शिरले की शेतात जाने सुद्धा कठीण झाले असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. बेंबळा प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे दरवर्षी एक ना अनेक शेतकयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.आज देवीदासजी तेलतुंबडे यांचा तीन एकर चना संपूर्ण जमीन दोष झाला आहे. शेतातील संबंधित अधिकारी यांनी येवून मोक्का पाहणी करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी देविदास आडकुजी तेलतुंबडे रा. खडकी यानी आज मंगळवार दि 16 नोव्हेम्बर रोजी प्रशासनाकडे केली आहे.