Now Loading

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंडचा पहिला T20 असेल खूप खास, पाहायला मिळणार 3 मोठे पदार्पण

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 मालिकेतील पहिला सामना उद्या होणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचा पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर या मैदानावर होणारा हा पहिला टी-२० सामना असेल. यासह राहुल द्रविड देखील जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून अधिकृतपणे पदार्पण करेल. याशिवाय रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून भारताचा पूर्णवेळ टी-20 कॅप्टन बनणार आहे. अशा परिस्थितीत उद्या होणारा सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे.
 

अधिक माहितीसाठी - Times Now | News 18 | Zee News