Now Loading

तालुका पत्रकार भवनाच्या जागेकरिता आम आदमी पार्टी सिन्देवाही यांची निवेदानातून मांगनी

चंद्रपूर जिल्हातील बर्याचशा तालुक्यात पत्रकार बांधव तसेच न्युज चॅनल च्या प्रतिनिधींना पत्रकार परीषद किंवा एखाद्या घटनेची सत्यता जाणून घेण्याकरीता हक्काचे पत्रकार भवन आहेत. परंतु सिन्देवाही तालुक्यातील पत्रकारांना हक्काचे पत्रकार भवन नाही. त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही कानाकोपर्यातील घटना असो किंवा कोणालाही पत्रकार परीषदेचे आयोजन करायचे असो त्यांना परावलंबी राहुन पत्रकार परीषदेचे आयोजन किंवा माहीती जाणून घेण्याचे कार्य करावे लागते. आपल्या हद्दवाढ झालेल्या नगरपंचायतचे कार्यक्षेत्रात राजस्व विभागाचे मालकिचे बरेचसे छोटे— मोठे भुखंड आहेत.त्यातील कमीत कमी 0.03 हे. आ. ते 0.05 हे.आ. जागा / भुखंड हा तालुका पत्रकार भवन सिन्देवाही — लोनवाही करीता देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन श्री मनोहर पवार विभागीय सदस्य आप चे नेतृत्वात जिल्हाधीकारी चंद्रपूर यांना तहसीलदाराचे मार्फतीने देन्यात आले, त्यावेळेस तालुका सहसंयोजक हिरालाल ईंदोरकर, विकास बावने, प्रविन मोहुर्ले, सुभाष गुरनुले, बाबुराव पेन्दांम व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.