Now Loading

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे टाटा सफारी पंधरा ते वीस फूट पुलाच्या खाली गेल्याची घटना घडली

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे गाडी नंबर MH 30 P 3131 टाटा सफारी काल रात्री अंदाजे साडे सातच्या दरम्यान पंधरा ते वीस फूट पुलाच्या खाली गेल्याची दुर्घटना घडली व दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच वडकी येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायकराव जाधव, भोंगाडे साहेब, आकाश कुदुसे, किरण दासरवार, जमदार रमेश मेश्राम, शंकर जुमनाके, नागरगोजे काही क्षणात दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले.ही टाटा सफारी वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथून राळेगाव तालुक्यातील रोहिणी धानोरा येथे येत असल्याची माहिती मिळाली. व चालक कैलास चंदनखेडे वय वर्ष 42 हे जागीच ठार झाले व त्यांच्या पत्नी मंजुषा कैलास चंदनखेडे वय वर्ष 38 या जखमी असून राळेगाव वरून यवतमाळ व यवतमाळ वरून नागपूर येथे हलविण्यात आल्या आहे, आयुष तडस वय वर्ष 13 हे जखमी असून यवतमाळ येथून सेवाग्राम येथे हलविण्यात आले, गुडिया चंदनखेडे वय वर्ष 12 जखमी असून यवतमाळ येथून सेवाग्राम येथे हलविण्यात आले , कुमारी स्वरा चंदनखेडे वय वर्ष 8 व मांडगाव येथील चालकाचे दोन मित्र यांना कोणतीही इजा झालेली नाही व पुढील तपास वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायकराव जाधव करीत आहे.