Now Loading

कल्याण पंचायत समितीचे उपसभापती पद शिवसेनेकडे पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणुका आज संपन्न झाल्या. वर्षभरापूर्वी उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून बंडखोरी केलेले नितीन ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इतर राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करत नितीन ठोंबरे हे उपसभापती पदावर विराजमान झाले. उपसभापती पदासाठी शिवसेनेने महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला होता त्यानंतर देखील ठोंबरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेतर्फे याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती .अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार ठोंबरे यांचे पद रद्द करण्यात आले . त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून शिवसेनेचे भरत भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती .आज झालेल्या निवडणुकीत भरत भोईर हे उपसभापती पदी विराजमान झालेत. कल्याण पंचायत समितीचे सभापतीपद हे शिवसेनेकडे होते आता उपसभापतीपदी देखील महा विकास आघाडीकडे आल्याने कल्याण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व झाले आहे