Now Loading

काँग्रेसला मोठा झटका, माजी विधानसभा अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना सदस्यत्व देऊन पक्षात त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शास्त्री यांनी २०२० मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. शास्त्री हे काँग्रेसच्या कट्टर नेत्यांपैकी एक मानले जायचे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.