Now Loading

{तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब } युवकांसोबतच महिलां भगिनींचाही विस्वास जिंकण्यात मनसेला यश {बोरी (इचोड) येथील युवक व महिलांचा मनसेत प्रवेश, )

राळेगाव तालुक्यात मनसे पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांचे नेतृत्वात जनसामान्यांची कामे मार्गी लावत मनसे ने आपले स्थान भक्कम केले. आज युवकांचा विस्वास संपादन करणारा पक्ष म्हणून मनसे तालुक्यात ओळखण्यात येतो. आता मात्र या पुढे एक पाऊल टाकत मनसे ने युवती व महिलांभगिनींचा देखील विस्वास प्राप्त केला असून बोरी (इचोड ) येथील युवक व भगिनींनी मनसेत प्रवेश करून यावर शिक्कामोर्तब केले आहे. राळेगाव तालुक्यातील बोरी (ईचोड)येथे क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोरी येथील शेकडो युवकांनी व माता भगिनींनी मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष गणेशभाऊ काकडे, तालुका सरचिटणीस गणेशभाऊ मांदाडे, कोषाध्यक्ष राहुलभाऊ गोबाडे, अमर प्रकाश आत्राम (शाखा अध्यक्ष) सौरभ प्रकाश बावणे (शाखा उपाध्यक्ष) जिवन सुधाकर आत्राम (शाखा सचिव) दिनेश नानाजी क्षिरसागर (शाखा सहसचिव) वैभव रमेश देठे (शाखा कोषाध्यक्ष)(सदस्य)किशोर नानाजी नैताम, खुशाल गोपाळा खिरटकार, शशिकांत पुंडलीक उईके, साहील विलास वेले, पंकज विजय कुमरे, आशिष गुणवंत परचाके, अनुप नानाजी सोनटक्के, विजय शत्रुघ्न नैताम, वैभव जवादे, कलिंदर पठाण, जगदीश गोबाडे, गिरीश कुंभारकर, गौरव तोडासे, मारुती ठाकरे,अनील मेश्राम, अमित ठाकरे आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते