Now Loading

कळंब तालुक्यातील उमरी येथे बेंबळा कालव्यात युवतीने घेतली उडी व आज बुधवारी वलीनगर येथे मयुरी चा मृतदेह सापडला

कळंब तालुक्यातील उमरी येथील युवतीने बेंबळा कालव्यात उडी घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मयुरी श्रीधर भोयर (१६) रा. उमरी असे कालव्यात उडी घेणाऱ्या तरूणीचे नाव आहे. युवतीने बेंबळा कालव्यात उडी घेतल्याचे लक्षात येताच नागरिकांनी कळंब पोलीस स्टेशनला माहिती दिली. मात्र केवळ एकच पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाला. युवतीचा शोध घेण्यासाठी बचाव पथकही दाखल झाले नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत युवतीचा शोध ग्रामस्थांकडूनच घेण्यात आला. मात्र अंधार पडल्याने व युवतीचा शोध न लागल्याने ग्रामस्थ माघारी परतले.तरुणीने बेंबळा कालव्यात सकाळी ९.३० वाजताही उडी घेतली होती. त्यावेळी तेथे असलेल्या युवकांनी कालव्यात उडी घेत तरूणीला वाचवून घरी सोडून दिले. मात्र एक ते दीड तासाने तरूणी पुन्हा कालव्यावर आली. बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडले असल्यामुळे कालव्याच्या पाण्याचा प्रवाह अधिक होता. त्यात तरूणीने पुन्हा उडी घेतली. दरम्यान यावेळी सुद्धा युवकांनी धाव घेतली. मात्र पाणी अधिक असल्याने कालव्यात उडी घेण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. तरूणीने, कालव्यात उडी का घेतली, ही बाब अद्याप उघड झाली नाही. उशिराने पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.व आज अत्यंत परिश्रमाने बुधवारी वलीनगर येथे मयुरी चा मृतदेह सापडला.