Now Loading

बारामुल्ला येथे CRPF वर ग्रेनेड हल्ल्यात 2 जवानांसह 4 जण जखमी

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील पल्हालन चौकात बुधवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफचे एक पथक गस्त घालल्यानंतर पल्हालन चौकात पोहोचले तेव्हा काही संशयित अतिरेक्यांनी त्यांना लक्ष्य करत ग्रेनेड फेकले.
 

अधिक माहितीसाठी: The Times Of India | The New Indian Express | Times Now News