Now Loading

सौरव गांगुलीची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या जवळपास एक दशकापासून या पदावर असलेले भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आता आपला कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कुंबळे गेली 9 वर्षे या पदावर होते, मात्र आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ही मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांची आयसीसी महिला क्रिकेट समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
 

अधिक माहितीसाठी: Times Now | CricTracker