Now Loading

कोरोना अलर्ट : प्राप्त 336 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 04 पॉझिटिव्ह • 2 रूग्णांना मिळाली सुट्टी

चिखली : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 340 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 336 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 04 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 110 तर रॅपिड टेस्टमधील 226 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 336 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                            पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : रामनगर 1, इतापे ले आऊट 1, डॉ. संचेती हॉस्पीटल जवळ 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 04 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचाराअंती 02 रूग्णांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.        त्याचप्रमाणे आजपर्यंत 734687 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86945 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86945 आहे. आज रोजी 75 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 734687 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87633 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.