Now Loading

गुरूनानक जयंतीदिनी दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द

चिखली : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असून येणाऱ्या शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी गुरूनानक जयंती आहे. जयंती निमित्ताने शासकीय सुट्टी असल्यामुळे 19.11.2021 रोजी तिसऱ्या शुक्रवारी जिल्हा रूग्णालयातील मनोरूग्ण / मतिमंद व कान, नाक, घसा संबधित दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथील सदर दिव्यांग तपासणीस येवू नये, आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.