Now Loading

जिल्ह्यात क्षयरूग्ण शोध मोहिमेला सुरूवात • 25 नोव्हेंबर पर्यंत चालणार मोहिम

चिखली : क्षयरूग्ण शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला 15 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदानव क्षयरोगावरील औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. यासाठी संशयीत क्षयरूग्णाचे रोगनिदान दवाखान्यात करण्यात येते. केंद्र शासनातर्फे या क्षयरूग्णाचे नोटीफीकेशन शासनाकडे करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्र शासनाच्यावतीने अद्यापही क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरूग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी सन 2021 मध्ये क्षयरूग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत आहे. क्षयरूग्ण शोध मोहिमेत अपेक्षीत पाच टक्के नमुने दूषित आढळणे अपेक्षीत आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या 27.25 लक्ष पैकी 408000 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये याकरीता 204 पथकांची निर्मिती करण्यात आली असून 41 सुपरवायझर, आशा वर्कर 408 एकूण टिम सदस्य असे एकूण 539 कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. झोपटपट्टी, पोहचण्यासाठी अवघड गावे, कारागृहातील कैदी, ज्या गावात जास्त रूग्ण असू शकतात असे गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटीत कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर, वृद्धाश्रम अशा निवडलेलया भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व इतर स्वयंसेवक हे गृहभेटीद्वारे संशयीत क्षयरूग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचा थुंकी नमुना गोळा करून तपासणी करीता जवळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. क्षयरूग्णांचा शोध घेवून त्यांचेवर उपचार करण्यात येणार आहे. याकरीता सर्वांनी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. डि व्ही खेरोडकर यांनी केले आहे.                                             क्षयरोगाची अशी असतात लक्षणे  दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, तसेच दोन आठवड्यापेक्षा जास्त मुदतीचा ताप असणे, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले रूग्ण.