Now Loading

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू • पात्र विद्यार्थीनींनी अर्ज करण्याचे आवाहन • http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

चिखली : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह बुलडाणा येथे आहे. या वसतिगृहासाठी शैक्षणिक सत्र सन 2021-22 करीता अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थीनींकरीता इयत्ता 11 वी व पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज भरून हार्डकॉपीसह शैक्षणिक कागदपत्रे वसतिगृह कार्यालयात सादर करावे. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना तेआधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतंत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झाला नसल्याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर खाते कार्यरत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रवेशासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, वर्ग 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र, मेडीकल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड छायांकित प्रत, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार संलग्न बँक खाते पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आदी अचूकपणे अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल आदिवासी शासकीय मुलांचे वसतिगृह, बुलडाणा यांनी केले आहे.