Now Loading

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांनी 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे • पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन • जळगांव जामोद, नांदुरा व शेगांव येथे वसतिगृह

चिखली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत असलेली शासकीय वसतिगृहे सुरू करण्यासाठी शासनाने आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा, जळगांव जामोद व शेगांव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.      प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता सुरू करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षीत टक्केवारीनुसार समाजातील अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जाती व जमाती, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. शालेय, महाविद्यालयीन, जळगांव जामोद, नांदुरा व शेगांव येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, महाविद्यालय, विद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहणार आहेत. वसतिगृहांमध्ये प्रवेश अर्ज वाटप सुरू झाले आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारिख 26 नोव्हेंबर आहे. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी नांदुरा वसतिगृहाकरीता 8983282269, 8975778949,जळगांव जामोद वसतीगृहाकरीता 8605313286, शेगांव येथील वसतिगृहाकरीता 7350809515, 8208661488 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जळगांव जामोद येथील गृहपाल ए.एस इंगळे,नांदुरा येथील गृहपाल एस. व्ही सोनटक्के, शेगांव येथील गृहपाल व्ही. एल बघे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.