Now Loading

सैनिक मुलाचे वसतिगृह येथे पदभरती, 23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे 

चिखली : सैनिक मुलांचे वसतिगृह, बुलडाणा येथे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर एक वर्षासाठी रिक्त पदांवर पदभरती करावयाची आहे. रिक्त पदांमध्ये सहाय्यक वसतीगृह अधिक्षकाचे एक पद असून या पदाकरीता केवळ माजी सैनिकांसाठी, हवालदार व त्यावरील तसेच एमएससीआयटी, संगणकाचा अनुभव असावा. स्वयंपाकीनची तीन पदे रिक्त आहेत. यासाठी माजी सैनिकांच्या पत्नींना प्राधान्य असणार आहे. सफाईवालाचे एक पद असून त्याकरीता माजी सैनिक अथवा सिव्हीलीयन पाहिजे. तरी इच्छूक माजी सैनिकांनी व विधवा यांनी 23 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.