Now Loading

ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूल, अंबरनाथ आणि कोपर स्थानकात होम प्लॅटफॉर्म तर विठ्ठलवाडी स्थानकात स्वयंचलित जिन्याचे होणार लोकार्पण झाले

कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास लवकरच सुकर होणार आहे. अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म, विठ्ठलवाडी स्थानकातील स्वयंचलित जिना आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे बुधवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे बुधवारपासून या सुविधा प्रवाशांसाठी आता उपलब्ध होणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरांचा वेगाने विकास होतो आहे. शहरांचे नागरीकरण होत असल्याने त्याचा भार आता पायाभूत सुविधांवर पडतो आहे. रेल्वे स्थानकांवर त्याचा होणारा परिणाम जाणवू लागला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, कोपर, ठाकुर्ली आणि विठ्ठलवाडी या स्थानकात गेल्या काही वर्षात प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे या स्थानकांवर पायाभूत सुविधा देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात स्वयंचलित जिना बसवण्याची अनेक वर्षांपासून मागणी होती. तर अंबरनाथ स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारून फलाट क्रमांक एकवरील गर्दी विभाजनाचा प्रस्ताव होता. कोपर रेल्वे स्थानकातही अशाच प्रकारे होम प्लॅटफॉर्म उभारण्याची मागणी होती. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पुलाची गरज होती. ही गरज ओळखून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्री यांची वेळोवेळी भेट घेऊन त्यांना पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे या कामांसाठी निधीची घोषणा करून कामाला वेगाने सुरुवात झाली. ही कामे नुकतीच पूर्ण झाली असून बुधवारी सकाळी १०.३० वाजता या कामाचे लोकार्पण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले